सध्याचे जग स्पर्धेच्या युगाकडे वाटचाल करीत आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर स्पर्धा परिक्षेची तोंडओळख होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेला सामोरे जाणे ही काळाजी गरज आहे. सदर संस्थेचा उपक्रम हा अतिशय चांगला असून या उपक्रमातून निश्चितच भावी पिढीतील अधिकारी घडतील. परिक्षेद्वारे शालेय अभ्यासक्रम परिपक्व होईल त्याच बरोबर स्पर्धा परिक्षेची जवळून ओळख होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परिक्षेस उत्तम प्रतिसाद द्यावा.
Dr.Dhammapal Mashalkar (Managing Director, Aadhar)
आजच्या युगात जो स्पर्धेत टिकेल तोच भावी आयुष्य सुखाने आणि समृद्धीने जगू शकेल. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षा काय आहे जाणून घेणे गरजेचे आहे. सदर संस्थेचा उपक्रम हाच आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची माहिती व्हावी व त्याचबरोबर जे विद्यार्थी खरोखरच टॅलेंटेड आहेत अशा विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देऊन त्यांना ‘सुपर टॅलेंटेड’ बनविणे यासाठी त्यांचा होणारा शैक्षणिक खर्च ही संस्था करणार आहे. खरोखरच हा उपक्रम विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आणि मदतीचा ठरणार असल्याने ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा.